शिल्लक घरे - गुंतवणुकीचा मार्ग ठप्प.
दिनांक १९ ऑगस्ट २०२३ लोकमत अंकातील "महामुंबईत आठ लाख घरांना गिऱ्हाईक नाही " वृत्त वाचले . महामुंबईची अंदाजे २ कोटी लोकसंख्येच्या, सामाजिक स्थित्यंतर, मागणी पुरवठा आणि आर्थिक गणितावर दरवर्षी दोन टक्के घरांची निर्मिती होते आहे . गेल्या दहा वर्षात ठाणे , नवी मुंबई , पनवेल , डोंबिवली, कल्याणच्या पुढे प्रचंड प्रमाणात बांधकामे वाढलीत . काही व्यवसायिकांनी सामान्यांचा विचार करून कमी क्षेत्रफळाचे घर बांधून ग्राहक वाढविले, पण मुंबई , ठाणे, नवी मुंबईत कमी क्षेत्रफळास सुद्धा जास्तीचा दर असल्याने मागणी कमी होऊ लागली. साहजिकच त्याचा परिणाम विक्रीवर होऊ लागला, त्यात कोरोना काळातील आर्थिक मंदीमुळे विक्रीवर परिणाम वाढतच गेला . विक्री मंदावल्याने सरकारचे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन , बँकांचे कर्जाचे कमिशन, व्यवसायीकांची आर्थिक उलाढाल परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत , परंतु पुरवठा असूनही सामान्यजन गुंतवणुकीपासून दूर आहे हे नक्कीच . शासनाने मध्यस्थी करून सामान्यांच्या आवाक्यातील घरे उपलब्ध करून दिल्यास, घरांची विक्री होऊन व्यवसायिकांची देखील आर्थिक चंचणीतून सुटण्याचा मार्ग मिळेल .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा