जनगणना सर्वेक्षण शक्य !!
म टा दिनांक २६ ऑगस्ट २०२३ अंकातील " जातनिहाय सर्वेक्षण पूर्ण " वृत्त वाचले . बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी याच वर्षी जाहीर केल्याप्रमाणे संबंधित डेटा संकलन सर्वेक्षण पूर्ण केले आहे . २०११ नंतर, २०२१ मध्ये कोरोना मुळे देशाची जनगणना झालेली नाही . आता दोन वर्षे होऊन देखील केंद्र सरकारची अजून हालचाल नाहीत . परंतु बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याचे जातनिहाय सर्वेक्षण करून एक पाऊल पुढे टाकले आहे. अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही याचे अनुकरण करून , जनगणना सर्वेक्षण करणे शक्य आहे. अद्ययावत यंत्रणेद्वारे ऍप वैगेरे च्या माध्यमातून , केंद्राने सुद्धा या मोहिमेस सहकार्य करण्यास हरकत नसावी. २०२३ वर्ष पूर्ण होण्याचा आत , जनगणना माध्यमाद्वारे, लोकसंख्या , स्त्री पुरुष , शिक्षण , रोजगार, वैगेरे जातनिहाय सह पाहिजे असल्यास सर्वच डेटा मिळू शकेल . जेणेकरून केंद्राला याचा मागोवा घेऊन, सार्वत्रिक निवडणूक,अंदाज पत्रक बनविण्यास सोपे जाईल. केंद्र आणि राज्य सरकारने यावर विचार करण्यास हरकत नसावी.
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा