मणिपूर - उपायांचा परामर्श घेणे आवश्यक होते .
दिनांक ११ ऑगस्ट २०२३, म .टा . संपादकीय " प्रचाराची रंगीत तालीम " वाचले . लेखात मा. पंतप्रधानासह, दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या विचारांचा मागोवा घेतला आहे. मणिपूर परिस्थितीचे गांभीर्य, खरे कारण प्रत्येक सदस्यांस ठावूक आहे. तिन्ही दिवसातील चर्चेचा सार पाहता ६५ वर्षांचा विरुद्ध गेल्या नऊ वर्षातील काळाचेच गणित मांडले गेले . लोकशाही प्रेमाचे भाषणे देणारे , खा .राहुल गांधी, भाषण करून त्वरित संसदेतून बाहेर पडलेत . तसेच संसदेस मंदिर मानणारे मा. पंतप्रधान फक्त भाषण करण्या पुरते आलेत, हेच मुळी आश्चर्य वाटण्यासारखे आहे. अविश्वास ठराव जरी सरकार विरुद्ध होता, पण त्यास मणिपूर प्रश्नाची धार होती , उत्तर देताना समयसूचकता बाळगून, सुरवातीसच मणिपूर प्रश्न हाताळला असता, तर थोडक्यात भाषण आटोपले असते . राजकीय कारकिर्दीचा पूर्ण इतिहास पटलावर मांडून , मूळ मुद्द्यांवर यायला बराच उशीर लागला . कोणत्याही उपायांचा परामर्श न घेता, केवळ सत्ताधाऱ्यांनी ठराव जिंकला हेच सार होते अधिवेशनाचे .
विजयकुमार वाणी , पनवेल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा