इंडियन सायन्स काँग्रेसने लखनौ परिषद भरवावीच .
दिनांक २८ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील "काँग्रेस मुक्तीचा आनंद " संपादकीयात, १०८ वर्षांच्या इंडियन सायन्स काँग्रेस या संस्थेच्या विज्ञान परिषदेतून केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने अंग काढून घेतल्याने अप्रत्यक्षरीत्या सरकारवर, नेतृत्वावर टिका केली आहे . ब्रिटिशांच्या काळात, संस्था उभारणे, चालविणे जिकरीचे होते, त्यात संशोधन, प्रगती विषयक संस्था उभारणे अवघडच असेल . त्या कारणाने तत्कालीन सरकारच्या साहाय्याने विज्ञान संशोधन क्षेत्रात कार्यासाठी "इंसाकाँ" ची स्थापन झाली असेल . सरकारी सहाय्यता मुळे कार्य सहज सुलभतेस वाव मिळाल्यामुळे, स्वातंत्र्या नंतरही परंपरा कायम राहिली असेल , गेल्या सहा सात दशकांत भारताने संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे . संशोधन क्षेत्रातही विविध शासकीय , खाजगी संस्थांचे प्रचंड कार्य सुरु आहे . १९६२ मध्ये 'भारतीय अंतराळ संशोधन समिती ' स्थापून अवकाश संशोधनातील संघटित प्रयत्नांना सुरुवात झाली, याच संस्थेच्या १९६९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो ) ने अंतराळ तंत्रज्ञान संशोधनात उल्लेखनीय कामगिरी बजावत आजच्या घडीला सर्वोच्च जागतिक मानांकन मिळविले आहे . या शिवाय , केंद्राने "आंतर
विद्याशाखीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन" क्षेत्रातही बेहरामपूर , भोपाळ, कोलकाता , मोहाली , पुणे , तिरुअनंतपुरम , तिरुपती येथे " आय आय एस इ आर " संस्थेची स्थापना करून प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना विज्ञानातील संशोधनाद्वारे सक्षम करणे हे प्रयत्नांनी साध्य केले आहे. डॉ सी व्ही रामन , डॉ भाभा , मेघनाद साहा , रामानुजन , डॉ कलाम , डॉ बोस , एच खुराणा , सी सुब्रमण्यम या आणि अनेक प्रतिभा संपन्न शास्त्रज्ञांच्या कर्तबगारीने जागतिक महासत्तांच्या मांदियाळीत संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले आहे .
भारतातील अनेक शास्त्रज्ञ भौतिक क्षेत्रात संशोधनातं कार्यरत
आहेत. केंद्राच्या संशोधन क्षेत्रात व्यतिरिक्त, टि आय एफ आर , इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजि , आय आय टी , बॉम्बे , मद्रास, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेत सर्वाधिक शास्त्रज्ञ कार्यरत आहेत .
ब्रिटिशांच्या काळात संशोधनात प्रोत्साहन देण्यासाठी जर्नल्स, व्यवहार प्रकाशित करून विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी, इंडियन सायन्स काँग्रेस चा उपयोग, अन्य संस्थांच्या मानाने कमी होत चालला असल्या असे ही कारण असू शकेल , या कारणाने केंद्राने सहभाग काढला असे वाटू शकते . पण एका अर्थी ते चांगलेच झाले आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे आधुनिक युगातील संशोधनात पुराण काळातील कहाण्यांच्या आधारे गोष्टी सांगण्याचे व्यासपीठ कमी झाले आहे . चांद्रयानाच्या यशस्वी भ्रमणामुळे संशोधनास एक नवी दिशा मिळाली आहे, याचा आधार घेत ,आणि आता कोणत्याही सरकारी धोरणांचा अडथळा नसल्यामुळे, सध्या प्रगतीपथावर असलेल्या उत्तर प्रदेशातील खाजगी प्रायोजकांच्या साहाय्याने इंडियन सायन्स काँग्रेसने लखनौ परिषद यशस्वी करण्यास हरकत नसावी .
विजयकुमार वाणी , पनवेल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा