म टा राउंड टेबल - राउंडची व्याप्ती चौफेर वाढवावी .
म टा दिनांक २७ नोव्हेंबर २०२३, अंकातील म टा राउंड टेबल "सांघिक प्रयत्नांची गरज" मुंबई पालिकेचा लेखाजोगा वाचला. म टा राऊंड टेबल अतिशय स्तुत्य उपक्रम असून, पालिकेचे शहरासाठी नियोजन कसे असावे, तसेच पालिकेला नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत याचे सखोल विवेचन केले आहे . या चर्चेतील महत्वाचा मुद्दा म्हणजे सोसायटी स्तरावर कचरा वर्गीकरण व्हावे . आजच्या घडीला मुंबई आणि उपनगर परिसरात, मोठं मोठे कॉम्प्लेक्स , टाऊनशिप उभ्या रहात आहेत. साधारणतः दोनशे तीनशे च्या पुढे कुटुंबे वास्तव्यास असलेल्या कॉम्प्लेक्स मधून प्रचंड प्रमाणात कचरा साठविला जातो . पालिकेची अपेक्षा आहे ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण सोसायटी स्थरावरच व्हावे . परंतु यातली एक पुढची पायरीचे सुद्धा पालिकेला नियोजन करता येईल, ते म्हणजे उपलब्ध कचऱ्याचे, बायो गॅस संयंत्रावर अल्प प्रमाणात वीज निर्मिती करून सोसायटीच्या वापरासाठी उपयुक्त होऊ शकेल. यामुळे कचऱ्याचे विघटन जागच्या जागी होईल , ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, वाहुतुक समस्या आणि डम्पिंग आणि दुर्गंधी या साऱ्यांवर नियंत्रण राहू शकेल. भविष्यात मोठ्याला टाऊनशिप निर्मितीसमयी या सयंत्रासाठी जागा ठेवावी याची खबरदारी घेऊनच, प्लॅन पास करण्यात यावा . तसेच म टा स विनंती की, म टा राउंड टेबलची एमएमआरडीए क्षेत्रात चौफेर व्याप्ती वा ढवून, वसई विरार, अंबरनाथ बदलापूर , नवी मुंबई पनवेल उरण शहरांच्या समस्यांचाही अभ्यास करून, सर्व पालिकांना एकमेकांच्या साहाय्याने अनेक उपक्रम राबविता येऊन संपूर्ण मुंबईचा अल्पावधीतच कायापालट होईल . याच आधारे नाशिक पुणे नागपूर आदी शहरांचॆ सुद्धा नियोजन होईल .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा