आरक्षणाचे वादळ !!
म टा दिनांक २० नोव्हेंबर २०२३, अंकातील " रात्र वैऱ्याची; दिवस वाचाळांचे " संपादकीय वाचले . एकंदरीत राज्यात फक्त आरक्षण या विषयावरच वादळ घोंघावत आहे असे दिसून येते . प्रकरण इतके हातघाईवर आणले गेले की, आजच्या आज आत्ताच्या आता आरक्षण मिळाले नाही तर परिस्थिती चिंताजनक होईल, दैनंदिन वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावर भरून येणारे रकाने , टि व्हि वरील सर्वच चॅनेल च्या बातम्यांमध्ये पहिला अर्धा तास आरक्षण विषयाला वाहिलेला आहे . एकीकडे सर्वोच्च न्यायायाल खाजगी क्षेत्रातील आरक्षण , स्थानिक म्हणून जागा राखीव ठेवण्याची कृती बेकायदा ठरवीत असताना, फक्त आरक्षण विषयासाठी राज्य सरकार महिने न महिने खर्ची घालत आहे . ३६ जिल्ह्यातून, २८८ विधानसभा सदस्यांचे किती प्राबल्य आहे , अभ्यास आहे , कोणत्या उपाय योजना राबविल्यास याचा प्रभाव कमी होईल याचा सारासार विचार अजिबात झालेला दिसत नाही . विरोधाला विरोध आणि प्रश्न ज्वलंत ठेवण्याचे कसब मात्र या सर्वांमध्ये आहे हे दिसून येते . असेच चालू राहिल्यास राज्य अधोगतीला जायला वेळ लागणार नाही .
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा