पाकिस्तान " कुवतीपेक्षा मिजास भारी "
दिनांक १४ जुलै २०२३, लोकमत संपादकीय "पाकिस्तानचे मरण उद्यावर" वाचले. विस्तृत आकडेवारीत पाकिस्तानने चीन , आयएमएफ , वर्ल्ड बँक , सौदी , युएई आणि खाजगी वित्त संस्थातून अंदाजे ४५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे . पाकिस्तानच्या अर्थ संकल्पाच्या आकाराएवढीच कर्जाची रक्कम आहे . आर्थिक संकटामुळे राजकीय अशांतता, ढिसाळ प्रशासन व्यवस्था , दरडोई उत्पन्नाचे प्रमाण , भरमसाठ भाववाढ , अशा अनेक संकटातून पाकिस्तान जात आहे . एवढ्या दयनीय परिस्तितीत सुद्धा , सरंक्षणावरील तरतूद, गेल्या वर्षांपेक्षा १५ टक्के अधिक आहे . सरंक्षणावरील खर्च यांचा भारताविरोधी द्वेष दाखविते . एखाद वर्ष सरंक्षणावरील खर्च कमी करून जनतेला मूलभूत सुविधा , रोजगार , अन्न आणि निवारा पुरविल्यास जनता सरकारला दुवा देईल आणि सरहद्दीवरील कुरापती कमी झाल्यास भारत देशासही शांतता मिळेल. पण कुवतीपेक्षा यांची मिजाससच भारी असल्यामुळे कर्ज घेऊ पण विरोध कायम राहील हेच दर्शविते .
विजयकुमार वाणी , पनवेल
गुरुवार, १३ जुलै, २०२३
लेख (१००) १४ जुलै २०२३
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा