इर्शाळवाडीचे आधुनिक पुनर्वसन व्हावे !
गुरुवारी २० जुलै २३ रात्रीच्या, दरड कोसळण्याच्या हाहाकाराने इर्शाळवाडी अक्षरशः भूमिगत झाली. उपरोक्त घटनेनंतर इर्शाळवाडीचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी पुढे आली. शासनाच्या कृती आराखड्यानुसार, पुनर्वसन कार्यास विविध खात्यांच्या कामात ,जागेची मालकी, पाणी-वीज पुरवठा, मलनिःसारण,रस्त्यांचे नियोजन यातील मतभिन्नता, दुसऱ्या बाजूस अपघातग्रस्त कुटुंब सावरलेली मानसिकता, जी त्यांना मूळ जागेवरच पुनवर्सन अपेक्षित असते. या कालावधीत संकटाची तीव्रता कमी झालेली असते, सरकार बदलते , शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात आणि पुनर्वसनासाठी वर्षानुवर्षे लागतात.
गतिमान म्हणवणाऱ्या सरकारने या साऱ्या बाबींचा विचार करून, बांधकामास कालावधी न दवडता, अद्ययावत सर्व सोयींनी युक्त टॉयलेट, बाथरूम, किचन, हॉल, बेडरूम अशी रेडिमेड घरे (कंटेनर अथवा मेटल) उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून प्रत्येक कुटुंबास समान जागा मिळून , छोटीशी टाऊनशिप तयार होऊन एकरूपता दिसून येईल, शिवाय भविष्यात अपघातांचा धोका कमी होईल. फक्त सुरक्षितता पाहून, जागा निवडून संदर्भात ग्रामस्थांचा विचार करावा, एक आदर्श प्रयत्न , प्रयोग करून पाहावा.
विजयकुमार वाणी, पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा