रविवार, २३ जुलै, २०२३

लेख (१०५) २३ जुलै २०२३



मनो दुर्निगृहं चलम !!


दिनांक २३ जुलै २०२३ लोकसत्ता अंकातील "नोलान उवाच " आणि लोकरंग मधील "तरि अवधान एकले दीजे " लेख वाचलेत.    नोलानने "ओपनहायमर" चित्रपटात "शोध लोकांच्या उपयुक्तेसाठी आहे का? त्याचे परिणाम दर्शविणारे मुद्दे मांडून , कृत्रिम बुद्धिमत्तेचा, तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार यावर त्याचे प्रश्नचिन्ह आहे, यावर शास्त्रज्ञ संशोधक यांची जबाबदारी बद्दल भाष्य  केले आहे .  श्री विश्राम ढोले यांच्या लेखात सुद्धा समाज माध्यमांवरील विविध खाते धुंडाळल्यावर रितेपण , गोंधळ, लक्ष विचलित होऊन मानसिक थकवा येतो .  मिळालेल्या माहितीतून समज निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावून , माहितीच्या आधारे समृद्धी आली तरी व्यक्ती समजुतीच्या बाबतीत गरीब होत आहे, हे  विधान महत्वाचे वाटते .  प्रस्तुत लेखात अवधान "चित्त "राखल्याने दुसरीकडे लक्ष जाणार नाही,  म्हणजेच मनाची अवस्था विषद केली आहे .  परंतु आधुनितकतेने आणि संशोधनाने, मोबाईल नावाच्या आयुधाने क्षणाला क्षणाला मनाची चंचलता अस्थिर होत आहे . कोणताही विषय , मुद्दा, वेगवेगळ्या स्वरूपात,  वेगवगेळ्या संदर्भात मांडला जातो , त्याचे महती, महत्व लक्षात ठेवावे न ठेवावे, पळे घटिका तास घंटा सरत नाही तोवर  दुसऱ्याच क्षणी आणखी दुसरा मुद्दा प्रदर्शित होतो तो लक्षात ठेवावा , त्यावर तिसरा अशा विविध अंगानी बुद्धी ठासून भरली जाते . एकाअर्थी ज्ञानात वृद्धी होते , तर विचार करण्याची क्षमता घटत जाते .  माहिती हवी असल्यास नुसत्या एका शब्दाचा अवकाश सारी माहिती समोर येते. परंतु तेवढाच मुद्दा लक्षात राहून, त्याचे मूळ विसरले  जाते .  नुकत्याच आलेल्याआर्टिफिशिअल  इंटेलिजन्स ( ए आय ),  चॅट जीपीटी, माध्यमांनी परावलंबन वाढते आहे .  या सर्वांचा उपजीविकेसाठी  वापर योग्य प्रमाणात असल्यास वावगे नाही , परंतु अती  वापराने प्रत्यक्ष जीवनात मनाची दुर्बलता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .  मनाच्या चंचलतेमुळे श्रीकृष्णाने वैफल्याने, नैराश्याने  ग्रासलेल्या अर्जुनास श्लोकांमधून मनाची अवस्थेवर ताबा मिळविण्यास सांगितले .  मनो दुर्निगृहं चलम, म्हणजे मन चंचल आणि आवारण्यास कठीण आहे, परंतु त्यावर ताबा मिळविणे कर्तव्याचे आहे .  गीतेतील हाच संदेश आजही व्यक्ती न व्यक्ती थोड्या फार फरकाने लागू पडतो आहे .  मनाची दुर्लबता वाढल्यामुळे छोटे छोटे आघातही सहन करण्याची शक्ती कमी झाली आहे.  या सर्वांचा गरजेपुरता मर्यादित वापर हा एक उत्तम मार्ग मानून, मनाची एकाग्रता पर्यायाने शारीरिक तंदुरुस्तीचे जातं करणे होईल . 

विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: