मंगळवार, ११ जुलै, २०२३

लेख (९८) १२ जुलै २०२३


कंत्राटी साठी पात्र उमेदवारांचा विचार व्हायला हवा.

लोकमत ११ जुलै २०२३ अंकातील " जिल्हा परिषदेच्या शाळांत आता कंत्राटी निवृत्त शिक्षक" वृत्त वाचले.  वृत्तात, मानधन आणि कमाल वयोमर्यादा याच्यसह डी एड, बी एड टिईटी, सीटीईटी, अभियोग्याता, बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण यांची संख्या निदर्शनास आणली आहे. केवळ न्यायालयीन प्रक्रिया, दिरंगाई मुळे शासनाने उपरोक्त निर्णय अंमलात आणल्याचे सांगितले आहे. कंत्राटीचा कालावधी सूचित केला नसला तरी वयाच्या ७० पर्यंत वयोमर्यादा म्हणजे १० वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. निवृत्तीनंतर पेन्शन सुरू आहेच, त्या व्यतिरिक्त आता मानधनही मिळेल. साहजिकच ह्या निर्णयाने पात्र उमेदवारांच्या पदरी निराशाच पडली.  निवृत्त शिक्षकांऐवजी पात्र फेरीतील उमेदवारांना कंत्राटी तत्वावर, योग्य मानधनावर, संधी मिळाली असती तरी त्यांनी आनंदानी स्वीकारली असती, अनुभव गाठीशी येऊन, शिक्षण शैलीत परिचित झाले असते. आता निकाल लागेपर्यंत पात्र उमेदवारांच्या वयात वाढ होऊन, त्यांना बाद देखील करण्यात येईल. या ऐवजी , शासनाने अजूनही निवृत्तांचा निर्णय थांबवून पात्र उमेदवारांना कंत्राटी पद्धतीवर नेमावे. 

विजयकुमार वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: