सोमवार, १० जुलै, २०२३

लेख (९७) १० जुलै २०२३


मेरिकतील प्रगल्भ लोकशाही ( ? ) तरीही जगावर वर्चस्व कायम !!

दिनांक १० जुलै २०२३लोकसत्तातीलसंपादकीय "स्पर्धेतील सहकार्य "अमेरिका आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधांचा लेख वाचला.  १७७६ साली स्वातंत्र्य मिळालेलाक्षेत्रफळातही मोठा असलेला देश अमेरिकाभौगोलिक दृष्ट्या कॅनडामेक्सिको हे शेजारी देश आहेततसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशियाकॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत. तरीही  सीमावाद आणि शेजारील शत्रुत्व अजूनही नाहीच.  दुसऱ्या  महायुद्धापर्यंत अमेरिका जागतिक युद्धात विशेष प्रभावित नव्हती. पण जपानने अमेरिकन बंदरावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला. यात महत्वाचे म्हणजे अमेरिकेचे मित्र राष्ट्र म्हणून चीनइंग्लंड आणि रशिया यांची नावे पुढे होती. दुसरे महायुद्ध समाप्तीनंतर अटलांटिक करार म्हणून २७ युरोपियन देश२ उत्तर अमेरिकन देश यांनी नाटोची स्थापना केलीयात अमेरिकेनेमित्र राष्ट्र  चीन, रशिया यांच्याशी दुरान्वयेही संबंध ठेवला नाही.  अमेरिका आणि सोव्हिएत युनियन मधील शीतयुद्ध सुमारे ४५ वर्षे चालले. हे शीतयुद्ध १९९० मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर संपुष्टात आले. सोव्हिएट्सच्या विघटनाने नव्वदच्या दशकात अमेरिका महासत्ता म्हणून उदयास आली आणि लोकशाही राष्ट्र म्हणणाऱ्या अमेरिकेने जगावर वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केलीविकसनशील राष्ट्रांवर व्यापाराच्या माध्यमातूनदुर्बल राष्ट्रांना रसद पुरवूनहक्क गाजविण्यास सुरुवात केली.  दक्षिण चीन समुद्रातील वर्चस्वावरून अमेरिका आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. इराण अमेरिकेच्या संबंधांनाही अनेक दशकांचा इतिहास आहे.  अमेरिकेने त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. क्युबा आणि व्हेनेझुएला हे दोन्ही देश वैचारिकदृष्ट्या अमेरिकेच्या भांडवलशाही धोरणाच्या विरोधात मानले जातात. राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या मतभिन्नतेमुळे सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती यांच्या अमेरिके सोबतच्या संबंधात अडथळे येत आहेत. अमेरिकेने आखाती देशांना धोरणात्मकदृष्ट्या गृहीत धरले आहेअसे आखाती देशांना वाटतेचीनची साम्यवादी व्यवस्थेतून बदल घडविलेली मजबूत अर्थ व्यवस्थाप्रमाणित परराष्ट्र धोरण आणि महासत्ताची महत्वाकांक्षाअमेरिकेच्या परराष्ट्र नीती धोरणाच्या आड येत आहे यासाठी स्पर्धक असला तरी स्वतःचा लाभ करून घ्यावामहासत्तांच्या स्पर्धेत आपल्या सोबत कोण आहे आणि आपल्या विरुद्ध कोण आहे याचा बारकाईने विचारअमेरिकेने परराष्ट्र धोरण राबविताना नक्कीच केला जातो. भविष्यात चीन धोरणात मित्र भारताला नमते घेण्यास भाग पडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.   जोपर्यंत अरे ला कारे उत्तर देणारा देश उदयास येत नाही तोपर्यंत अमेरिकन महासत्तेची गणिते,  कुणीही शत्रू नाहीकुणीही  मित्र नाही, या तत्वावर प्रगल्भ लोकशाहीच्या (?) नावावर चालूच राहील. 

 


विजयकुमार आप्पा वाणीपनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: