ठावूक आहे का तुझ काही ?
आज अधिक श्रावण शु ९, शके १९४५, तूळ चंद्र, विशाखा नक्षत्र, गुरुवार दिनांक २६ जुलै २०२३.
आजच्या ५७ वर्षांच्या मागे, तीच अधिक श्रावण नवमी, शके १८८८, तुळ चंद्र, विशाखा नक्षत्र, दिनांक २६ जुलै १९६६ फक्त वार मंगळवार होता. नेहमीप्रमाणे मुंबईतील मुसळधार पाऊस, अल्पशा आजाराचे निदान न झाल्यामुळे सर्वसाधारण रुग्णालयात न्यायचे निमित्त आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
४ मार्च १९५२ रोजी विवाह झाला. पतीची मुंबईत नोकरी म्हणून ६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत येणे झाले. त्याच दिवशी महामानव यांच्या निधनाने मुंबापुरी गजबजली होती. गर्दीतून स्वतःला सावरत सावरत, संसार उभारायला किरोळ घाटकोपर येथे निवासास सुरुवात केली. कष्टमय जीवनाच्या संघर्षाला सामोरे जात १९६० मध्ये नवीन वास्तूत दोन खोल्यांच्या जागेत संसार सुरू केला. दरम्यान सहा अपत्ये झाली होती. आधीच क्षीण प्रकृती त्यात कुटुंबाचा भार, त्याचा प्रकृतीवर परिणाम होत होता. न जाणे आजार बळावत असतानाच पोट दुखण्याचे निमित्त होऊन, पदरी असलेल्या एकाही अपत्यात जीव न अडकवता, अचानक संसारातून निघून जाणे झाले. सर्वात मोठी दहा अकरा वर्षांची तर धाकटी वर्षाच्या आतली. कळणे न कळणे पलीकडील विश्व. पक्षाच्या घरट्यातील किलबिलाट थांबविला अन् घरटे खिळलेले व्हावे अशी विध्यात्याची रचना.
दिवसागणिक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आजोळ माहेरावून कर्तव्याचे दर्शन घडवित, पिलांचे पक्षात रूपांतर होईस्तो त्यांच्या घरट्यात विसावे पर्यंत साथ दिली. पण तिचे अचानक जाणे स्मृती राहिली , निर्माण झालेली पोकळी, निर्वात अवकाश, कालावधीतील प्रगतीत भरत गेला. दुःख, वेदनांचे रूपांतर, ओंजळीत भरून राहिलेल्या प्राजक्ताच्या फुलासम सर्वत्र सडा पडल्यागत, सर्वदूर सुगंध भरून राहिले. टपोऱ्या हाराची शृंखला, तिच्या जाण्याने हार सैल झाला पण सर्वांच्याच सहकार्याने कधी तुटला नाही की विखरला नाही. त्याचा टवटवीत पणा कायम सुगंध देत राहिला. २६ वर्षांनंतर वात्सल्याची दुसरीही कडी निखळली परंतु संयम, त्याग, संस्काराच्या आधारावर आजही हाराचा टवटवीतपणां निखळ सौंदर्यात आहे.
पण प्रश्न कायम आहे, ठाऊक नाही मज काही, ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई ? या गीतातील ओळींची कायम आठवण येते. अजाण वयात असल्या कारणे, डोळ्यात कुठलीही छबी नाही, केवळ आठवणींच्या हिंदोळ्यावरील , गप्पांच्या माध्यमातून आजोळच्यांच्या वर्णानातून जे चित्र निर्माण होते ते म्हणजे मध्यम उंचीची , सडपातळ बांध्याची कपाळी कुंकू अन् डोक्यावरील पदरातील नववार साडीतली आई, बस एवढेच काय ते स्मरण. आजच्या सारखे ना कोणते फोटो ना व्हिडिओ ना आवाज ना सवांद. परंतु हे सर्व काही नसल्यानेच खरे क्षण न क्षण, अहं तीच्याच सावलीत जगणे हेच पुण्य पदरी असल्याने, सारे साठीस जरी पोहोचले तरी कधी उणीव भासली नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कृतीतून, संस्कारातून, वागण्यातून, बोलण्यातून, अखंड डोकावित असते. त्यात आईच्या निधनानंतर सव्वीस वर्षे मायबाप म्हणून सर्वांगीण उन्नती करणारे जीवनदाते निर्वतले, ते तर हृदयातच विसावले आहेत. म्हणून या ओळी ओठांवर येतात, म्हटल्या जातात, आर्तता दाटून येते, पणं दुसऱ्याच क्षणी मनी वात्सल्य जागृत होते, ते दोघं म्हणतात मी , आम्ही कुठे गेलोत, तुमच्यातच आहोत, कायमचे, लक्ष्मी नारायणाच्या हृदयातील कमळासारखे उत्साही, प्रसन्नदायी, आनंददायी, तरीही या अंतर पडलेल्या, मातृत्वाला शतशा: प्रणाम. !!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा