" जीतेगा भारत " इंडियाची आर्तता !!
दिनांक २० जुलै २०२३, लोकसत्तातील " एक तरी आघाडी अनुभवावी " संपादकीय वाचले . लेखात आघाड्यांचा धर्म , नावांचे साधर्म्य , गरजेपुरता संगत आदी विषयांवर भाष्य केले आहे. २०१४ आणि १९ मधील युपीए आणि एनडीए यांच्यातील लोकसभा निवडणुकीतील संघर्षाची सरासरी पाहता एनडीए पक्षांची मोट बांधण्यात अग्रेसर होताच , आताही २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीही जास्तीत जास्त पक्षांना एकत्रित केले आहे. भाजपचे स्वतःचेच बळ बहुमतापेक्षा जास्त आहे , परंतु आताची प्रत्येक राज्यातील भाजपची आणि अन्य पक्षांची स्तिथी पाहता , भाजपने एनडीएच्या माध्यमातून बहुमताचा आकडा तरी गाठावा असा प्रयत्न होत आहे . भाजपचे एकही लोकसभा सदस्य नसलेली राज्ये म्हणजे आंध्र , मेघालय , मिझोराम , नागालँड , सिक्कीम, तामिळनाडू , अंदमान. उर्वरित प्रत्येक राज्यात भाजपचे,उत्तर प्रदेशातील जास्तीचे ६४ सदस्य ते उर्वरित छोट्या राज्यात एक तरी सदस्य असून ३८ टक्के मतांच्या आधारावर ३०३ सदस्य आहेत. या उलट युपीए (आजची इंडिया ) यांच्यातील सहभागी पक्षांतील काँग्रेसचा, केरळचा १४ सदस्यांचा अपवाद वगळता आंध्र, अरुणाचल , बिहार , गुजरात , हरियाणा , झारखंड , ओडिसा , त्रिपुरा , उत्तर प्रदेश , उत्तराखंड ,आदी राज्यात एकही सदस्य नाही, जमेची बाजू म्हणजे कर्नाटक , छत्तीसगड , हिमाचल , राजस्थान येथील राज्ये सरकारे अधिक उर्वरित इंडियातील प्रादेशिक पक्षांचे स्वतःचे सरकारे हा एक भक्कम आधार आहे . भाजपच्या २०१९ मध्ये निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याने, स्वतःच्या ताकदीवर , केलेल्या कामावर, पुन्हा निवडून येण्याचे ठरविल्यास (मोदींची जादू ओसरली असे धरून) विरोधकांची गणिते पुन्हा बिघडू शकतात . काँग्रेसला आता आधार आहे फक्त प्रादेशिक पक्षांच्या राज्यातील कामगिरीचा, एनडीए सरकारच्या मागे न लागता, योग्य धोरण प्रचाराच्या साहाय्याने मतदारापर्यंत पोहोचण्याचा . त्यातील प्रचाराचा केलेला श्री गणेशा इंडिया नावाने आणि "जीतेगा भारत " या टॅग लाईनने , जी लोकांचे साहजिकच लक्ष वेधून घेऊ शकते . शक्तिशाली भाजपास पर्याय म्हणून प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचणे आणि सशक्त पर्याय उभा करून उर्वरित ८ महिन्यांच्या आत प्रत्येक लोकसभा क्षेत्रात पर्यायी उमेदवार ठरविणे हेच लक्ष्य असावे, बाकी पंतप्रधान कोण हे ज्याचे पारडे भारी तो आपोआप होईलच .
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा