बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

लेख (५१) ८ जानेवारी २०२३

 पोट निवडणुका आणि उमेदवारी

नुकत्याच पुणे विभागातील दोन विधानसभा पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि उमेदवारी साठी इच्छुकांनी नेतृत्वास साकडे घातले. राज्याचा पूर्व इतिहास पाहता, पोट निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मयत सदस्यांच्या घरातीलच व्यक्तीच्या नावाचा आग्रह धरला जातो कारण सहानुभूतीच्या माध्यमातून मते मिळवून विजयाची खात्री केली जाते. आणि हाच प्रयोग सर्वच पक्ष राबवित आहेत. पण यात खरे नुकसान होते ते त्याच विभागातील नेत्यांचे, पक्ष कार्यकर्त्यांचे. तिकीट वाटपा समयी, या नेत्याने, नेत्यांशी असलेल्या जवळीकी पायी तिकीट प्राप्त केले असते आणि पक्ष आदेशामुळे या नाराज नेत्यांना, पुढच्या वेळेस नक्की, अशी अमिषे दाखवित, वेळ मारीत निवडणुका पार पाडीत असतात. आता हाच नेता, कार्यकर्ता या विजयी नेत्याच्या पुढच्या प्रमोशनची वाट पाहत आपल्या जीवनातील महत्वाची वर्षे खर्ची करत असतो. दुर्देवाने विजयी उमेदवारांचे निधन झाल्यास, या नेत्यांच्या अपेक्षा वाढतात पणं दुर्दैव यांचं तिथेही पाठ सोडीत नाही आणि सहनभुतीच्या नावावर घराणेशाही सुरू होऊन, बिच्चारे नेते, कार्यकर्ते साठीच्या उंबरठ्यावर पोहोचून घराण्याची विजयाची परंपरा कायम करीत असतात. गेल्या ५० वर्षांचा इतिहासात, अंदाजे १०० नेत्यांच्या निधनाने १०० कार्यकर्त्यांचे करिअर बरबाद झाले असेल आणि १०० घराण्यातील कोणतेही राजकीय लेबल नसताना निवडून आलेले असतील. यास ना राजकारणी जबाबदार ना घराणेशाही जबाबदार यास केवळ सत्तालालसा हेच तत्व मोठे ठरते आणि पक्ष निष्ठा सेवा सारी एका क्षणात नष्ट होते. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: