गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

लेख (५९) १६ फेब्रुवारी २०२३


लोकप्रतिनिधी कशासाठी?

दिनांक १६ फेब्रु. २३, लोकमत संपादकीय "या किंकाळ्या कोण ऐकेल? " वाचले. अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटनेने मन सुन्न झाले. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात साधं अन्न वस्त्र निवारा या मूलभूत बाबींसाठी सुद्धा जळुन मरावे लागले या शिवाय कोणते दुर्दैव. काय मागणी होती गरिबांची राहत्या घरात राहुद्या, त्यास शासनास, लोकप्रतिनिधींना पर्याय निर्माण करता आला असता, पणं राक्षसी वृत्तीचे प्रशासन, स्वार्थी आपमतलबी लोक प्रतिनिधी यांनी मग्रूर वृत्तीने निवाऱ्यासाठी लढणाऱ्या गरीब कुटुंबातील मनुष्य हत्येचे पाप केले. योगीपुरुष मुख्यमंत्री यांचे यांच्यावरील नियंत्रण काय आहे ते दिसून आले. अब्जावधी रुपयांची गुंतवणूक मिळाली म्हणून पहिल्या पानावर महिनाभर जाहिरात करणारे मुख्यमंत्री पर्यायी व्यवस्था म्हणून निवारा सुद्धा देऊ शकत नाही, काय म्हणावे यांच्या सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री सन्मानाला. आता दोषींना जलद न्यायालयात शिक्षा करू असे तारे तोडणारे, गेलेले जीव परत आणतील का?

विजयकुमार वाणी, पनवेल 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: