रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

लेख (५५) १३ फेब्रुवारी २०२३

 एलआयसीने खाजगी क्षेत्रातील गुंतवणक परत घ्यावी.


आजच्या १३ फेब्रुवारी म. टा. संपादकीय "प्रामाणिक माणसांचा खिसा " लेखात नियामक संस्था, सामान्य गुंतवणुकदाराचे रक्षण या संबंधी योग्य खुलासा केला आहे. सामान्य माणसाने सरकारी आयपीओ म्हणून एलआयसीत गुंतवणुक केली. रू.९०३ भावाने प्रत्येकी ७७ शेअर्स अदा केलेत, परंतू रू.८२६ भावाने लिस्टिंग होऊन सुरवाीतीस १० टक्के नुकसान झाले. गत सहा महिन्यात आकडा खालीच राहिला त्यात, अदानीतील खाजगी गुंतवणुकीने तर ४८ टक्के तळ गाठून सामान्य माणसांची २२ हजाराहून अधिक नुकसान केले. अशा लक्षावधी गुंतवणुकदारांचे कोट्यवधींचे नुकसान एलआयसीने केले आहे. भांडवली बाजारातील एलआयसीत गुंतवणुक ही केवळ सरकारी म्हणून झाली पणं खाजगी क्षेत्रात गुंतवणक करून सामान्य माणसांना विशेषतः निवृत्त धारकांचा विश्वासघात केला आहे. अदानीने आयपीओ परत घेऊन गुंतवणकदारांचे पैसे परत केलेत, तसेच एलआयसीने खाजगी क्षेत्रात गुंतवणक परत घेऊन सामान्यांचे पैसे परत करावेत किंवा समभाग संतुलित अवस्थेत ठेवावा.


विजयकुमार वाणी, पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: