करून दाखविले !! ह्याच वृत्तीची पुनरावृत्ती.
दिनांक १० फेब्रुवारी लोकसत्ताच्या "तर बरे झाले असते" संपादकीय वाचले. यात मा. पंतप्रधानाच्या दोन्ही सभागृहातील भाषणांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थसंकल्प या दोन विषयांवर दोन्ही सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते. अदानी समूहाच्या पडझडीचे मा.अर्थमंत्र्यांनी केलेले निराकरण विरोधकांना अर्थ हिन वाटले. त्यामुळे स्पष्टीकरणाची मागणी वाढू लागली. अंतिमतः मा. पंतप्रधानांनी लोकसभेत आणि राज्यसभेत अतिशय आवेशपूर्ण भाषणात गेल्या ८ वर्षांतील केलेल्या कामांचे पाढे वाचले, जे आता सर्वांचेच पाठ होत चालले आहे, त्यासोबतच गेल्या दशकातील निष्क्रियता निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना, सामान्यांना हे अपेक्षित नव्हतेच, त्यांना अदानी समूहाच्या पडझडीचे अर्थ व्यवस्थेतील परिणाम, यापुढील सरकारचे धोरण , शिक्षण, रोजगार, सरकारी खाजगी गुंतवणूक, शेजारील राष्ट्रांशी संबंध, गेल्या आठ वर्षातील घोषणा केलेली राहिलेली कार्ये , अधिक येणाऱ्या वर्षात होणारी कार्य यासंबधी चर्चा होणे गरजेचे होते. परंतु दुर्दैवाने यातील काहीही स्पष्टता व्यक्त न करता, केवळ करून दाखविले, आम्हीच केले , याची पुनरावृत्ती होत राहिली. येत्या पंधरा महिन्यात दुसऱ्या टर्मचा कार्यकाळ संपत आहे, अजूनही वेळ न दवडता सर्व सामान्यांच्या मनात सरकारची प्रतिमा यापेक्षा चांगली राहण्यासाठी विरोधकांच्या मागणीचा खुलासा व्हावा की अदानी समूहाच्या पडझडीने अर्थ व्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही हे जाहीररीत्या घोषित करावे.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा