विश्वासाहर्ता बातम्यांसाठी आर्थिक व्यवहारांचे काय?
१६ फेब्रुवारी २३, लोकसत्ताच्या संपादकीयात बीबीसी प्रकरणासंबधी "बंदीच बरी" लेखात अनुलेखाने बरेच कोरडे ओढले आहेत. शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बीबीसी माध्यमाचे जगभर जाळे पसरले आहे. याच्या आधारावरच आणि नावाच्या दबदब्यावर यांच्या बातम्यांची विश्वासाहर्ता टिकून असल्याचे दिसून आले. परंतु गेल्या पन्नास वर्षात वृत्तपत्र माध्यमांत अनेक अंगांनी प्रगती झाल्याने प्रत्येक देशातील वृत्तपत्र संस्था, दूरदर्शन संस्था , आदी माध्यमांनी चौफेर प्रगती केली आहे. प्रत्यक्ष सामोरे जावून वृत्तांकनाची सोय झाल्यामुळे बातमी खरीच आहे यावर दुमत नसते, त्यामुळे बीबीसी एकमेव विश्वासाहर्ता वृत्तसेवा हे मोडीत निघाले आहे. राहता राहिला आर्थिक व्यवहारांचा प्रश्न, जगभर जाळे विणलेल्या या संस्थेचा अर्थ व्यवहार नक्कीच अब्जावधींचा असणार, त्यात गेल्या वीस पंचवीस वर्षातील स्पर्धेमुळे चढ उताराचा आलेखात, अग्रभागी राहायच्या हट्टापायी व्यवहारात उन्नीस बीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गैरव्यवहाराच्या धागेदोऱ्यांचा धूर कुठेतरी निघत असल्यामुळेच प्राप्तिकर विभागाने सर्वेक्षण केले असावे. यात बातम्यांच्या विश्वासाहर्ताचे प्रतीक म्हणून स्वतःला गौरवून घेण्यापेक्षा आर्थिक बाबतीत पणं विश्वासाहर्ता आहे हे सिद्ध करावे.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा