सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

लेख (५६) १३ फेब्रुवारी २०२३

 


काश्मिरातील लिथियमचे साठे आशेचा किरण

दिनांक १३ फेब्रुवारी २०२३, लोकसत्ता संपादकीय "विरोधाभासाचा कोळसा आणि" या लेखात खनिज तेल, कोळसा आयात ते इंधन, ऊर्जा निर्मिती संबंधी चिंता व्यक्त केली आहे. एकंदरीत सारांश असा की, पुढची अनेक वर्षे खनिज तेल, कोळसा, आयातीवरच देशाला अवलंबून राहावे लागेल. तसेच, दिनांक ६ जानेवारी २०२३ लोकसत्ता संपादकीयात "हायड्रोजनला ऑक्सिजन" इंधन निर्मिती, पर्यायी इंधना संबंधी सविस्तर वृत्तांकन केले होते. सदर लेखात हायड्रोजन साठविण्यासाठी बॅटरी आणि त्यासाठी लागणारे लिथियम आणि कोबाल्ट ही मूलद्रव्ये , यांच्या मालकीसाठी असलेली जागतिक स्पर्धा यासंबधी सविस्तर वृत्तांकन केले होते. याच अनुषंगाने ह्या वृत्ताची दखल घ्यावीशी वाटते. केंद्रीय खानिकर्म मंत्रालयाच्या माहितीनुसार जम्मू काश्मीरातील रिसाई जिल्ह्यात लिथियमचे साठे सापडले आहेत जे ५९ लाख टन एवढे असून ऑस्ट्रेलिया पेक्षा जास्त असून, चिली नंतर आपलाच नंबर लागेल. लिथियम प्रामुख्याने मोबाईल, लॅपटॉप आणि आत्ताच निर्मिती होत असलेल्या इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीतील महत्वाचा घटक आहे. पारंपरिक इंधनाचे साठे संपुष्टात आल्यानंतर , अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, हरितऊर्जा , या मार्गाने जावे लागेल. भारताच्या प्रगतीतील एक नवा आध्याय सुरू होत असून, एक आशेचा किरण भारत देशास लिथियमच्या रूपाने मिळाला आहे. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: