टोल घेता - विना अडथळा वाहतुकीचे रस्ते पुरवा ,
म, टा, दिनांक १० ऑक्टोबर २०२३ अंकातील "अवलोकन सदरातील टोल वरून पुन्हा खडाजंगी " लेख वाचला . सहापदरी निर्मनुष्य , विना अडथळा, शंभर किमीच्या काँक्रीट रोडवर , गाडी दामटायला मिळते याच वैशिष्ट्यामुळे, अठरा- वीस वर्षांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर प्रवासी तोल न जात टोल भरत आहेत . पण अशीच सेवा मुंबईतील प्रवेश द्वारावर, राज्यातल्या अंतर्गत रस्त्यांवरील टोल भरल्यावर अजिबात मिळत नाही . तासनतास रांगेत उभे राहणे , थोड्या थोड्याश्या अंतरावर दोन शहरांसाठी टोल भरणे , खड्ड्यांचे साम्राज्य , अनधिकृत पार्किंग , गॅरेजेस , ढाबे , दुचाकी , ऑटो यांची प्रचंड वाहतूक, ठिक ठिकाणचे फ्लाय ओव्हर्स , सिग्नल्स , माणसांच्या गर्दीतून वाट काढीत, शहरातील, उपनगरातील ठिकाणी पोहोचणे दिव्यच असते . सोयी- सुविधांच्या अभावापायी केवळ, रस्ता आहे म्हणून टोल आकारणे कितपत योग्य आहे . टोल आकारताना, रस्त्याचे आयुष्य , डागडुजी खर्च , जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची संख्या यावर ठरविले जात असेल तर , वाढलेल्या गाड्यांची टोल आकारणी मुळे, वेळेच्या आत वसुली होणे शक्य आहे , परंतु तसे होताना दिसत नाही . राज ठाकरेंच्या आंदोलनाचा विचार व्हावा , अन्यथा विना अडथळा वाहतुकीचे रस्ते पुरवा , तक्रारी राहणार नाहीत .
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा