आय टी सह सर्वच कंपन्यांनी कपातीचे पाऊल उचलल्यास आश्चर्य वाटायला नको .
१६ ऑक्टोबर २०२३, लोकसत्ता अंकातील " स्थूलातील समज , सूक्ष्माचे सत्य " संपादकीय वाचले . माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आर्थिक मंदी आणि कर्मचारी संख्येच्या कपातीचे माहितीपूर्ण विश्लेषण केले आहे. यातील महत्वाचा मुद्दा असा की , कोरोना काळात घरातच राहावे लागल्यामुळे, लोकांच्या मानसिकतेत, तंत्रज्ञानात बदल करून ,खरेदी, शाळा , ऑफिस , मिटींग्स , व्यायाम प्रकार , आदी सर्वच क्षेत्रात ऑनलाईनचा लक्षणीय वापर केला गेला . कंपन्यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात नको असलेल्या कर्मचाऱ्यांची, शिवाय अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासू लागली. दुसऱ्या टाळेबंदीनंतर, वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आणि कंपन्यांनी विक्रमी नफा कमावला . ऑनलाईन वाढीचा दर कायम राहण्याचा आशेने कर्मचारी संख्या फुगत गेली , परंतु कोरोना ओसरल्यावर स्थिती पूर्वपदावर आल्यावर मात्र ऑनलाईनचे प्रमाण निम्म्यावर आले, निर्बंध उठल्यामुळे लोक पूर्वीच्या जीवनशैलीकडे परतले . वर्क फ्रॉम होम चे ,ऑनलाईन मिटिंगचे प्रमाण रोडावत गेले. कोविड साथीमुळे जगभरातील आर्थिक वाढ मंदावली होती, निर्बंध शिथिलते नंतर, अर्थ चक्र रुळावर येत असताना रशिया युक्रेन युद्धामुळे, गत वर्षीच्या दुसऱ्या तिमाही पासून वाढत्या चलनवाढीचे पडसाद अर्थ व्यवस्थेवर उमटून महसुलात, नफ्यात घट जाणवू लागला . बलाढ्य अमेरिकेतील मंदीची भीती , फेडरलने वाढविलेले व्याजदर , युरोपातील युद्धांमुळे महागाई वाढीची भीती , याचा सर्वस्वी परिणाम सेवांच्या किंमती वाढल्यात . उच्च व्याजदर , जास्त खर्चामुळे, महागाई वाढली विशेषतः आय टी कंपन्याना, खर्चाची पूर्तता करण्यासाठी व्यवसाय खर्चात मेळ बसवावा लागत आहे . कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना खर्चात कपात होऊन, नफ्याची अपेक्षा असते, त्यामुळे गुंतवणूकदार धोकादायक क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छित नाहीत . यासाठी आय टी कंपन्यांना, जाहिरातीवरील खर्चात, कर्मचारी नियुक्ती , कपातीचा निर्णयाच्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करावे लागले. याचे सारे परिणाम कर्मचाऱ्यांच्या नोकरी कपातीत होत असून, अर्थव्यवस्था रुळावर येईपर्यंत, सावधगिरीचा उपाय म्हणून आय टी सह सर्वच कंपन्यांनी कपातीचे पाऊल उचलल्यास आश्चर्य वाटायला नको .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा