३७० कलम - काश्मीर पुनर्रचना विधेयक यांचे परिणाम काय ?
पूँछ जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर गुरुवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत , संसदेत मध्यंतरी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती ) विधेयक मांडताना मा गृह मंत्र्यांनी २०१९ मध्ये ३७० कलम हटविल्यानंतर दशहतवाद्यांच्या हल्लेचे प्रमाण कमी झाले असून, पाकव्याप्त काश्मीर साठी तत्कालीन प्रधानमंत्री श्री नेहरूंना दोषी धरत, जलविद्युत ,सिंचन प्रकल्पाने विकास सुरु होत आहे असे प्रतिपादन केले. ३७० कलम हटविल्यानंतर दहशतवाद कमी होईल. असे कधीच म्हटल्याचे गृह मंत्र्यांनी सांगितले . परंतु गेल्या वीस वर्षात ७० टक्के दहशतवाद कमी झाल्याचे सांगतिले.
दहशतवादात घसरण झाली आहे का ? हा मोठा प्रश्न आहे. ७० टक्के दहशतवाद कमी झाला असताना, आजच्या वृत्तासह
या आधीही २४ महिन्यात प्रत्येक दिड दोन महिन्यांच्या अंतराने ३४ जवानांचा बळी घेतल्याची नोंद आहे , म्हणजे जवानांच्या हत्यांचे सत्र सुरूच आहे. भारतीय सामान्यांना परिस्तिथीचे अवलोकन होत नसेल, परंतु , फेब्रु १९ चा एअरस्ट्राईक, १९ मध्येच ३७० कलम हाटिवणे , सुरक्षा रक्षा मजबुतीने धोरण,
जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती ) विधेयक, या
संवैधानिक मार्गाने दहशतवाद समूळ नष्ट होताना दिसत नाही . यासाठी कणखरतेचें प्रदर्शन करत , पुन्हा एअर स्ट्राईक अथवा सरळ सरळ युद्ध पुकारल्यास, दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा बसून, जवानांचे हत्या सत्र थांबविले जाऊ शकते .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा