उंचीलाही मर्यादा असाव्यात.
सकाळ दिनांक १३ डिसेंबर २०२३, अंकातील "उंच झोक्याचा अर्थ " संपादकीय वाचले. देशाची अर्थव्यवस्थेच्या आकाराचे मानक म्हणजे त्या देशाचा जीडीपी. जीडीपीच्या बाबतीत, आज भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे, पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचं स्थान जगातील पहिल्या १०० देशांमध्ये नाही. याची महत्त्वाची कारणं म्हणजे मोठी लोकसंख्या आणि दुसरंसंपत्तीचं विषम वितरण होय. भारत जगातील तिसरी अव्वल अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आर्थिक कार्यक्षेत्र वाढल्यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा होईल. परंतु सामान्य लोकांच्या जीवनात आणि त्यांच्या आर्थिक सुबत्तेत शक्यतो फरक पडणार नाही. याच अनुषंगाने आणि देशांतर्गत स्थिरतेमुळे शेअर बाजार उसळी घेत आहे, गेल्या ९ महिन्यात तब्बल तेरा हजार अंकांनी उसळी घेत, विक्रमी उंचीवर पोहोचला आहे. उंची गाठताना पाया ,पायऱ्या,मजलेही मजबूत आहेतच, पणं सामान्यतः किती उंची गाठावी,यालाही मर्यादा असतीलच, अन्यथा जागतिक अर्थव्यवस्थेत असलेली मंदी पहाता, २००८ ची अमेरिकेतील वित्तीय अडचणींची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विजयकुमार वाणी, पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा