गण गण गणात बोते🙏🙏
फाल्गुन एकादशी निमित्त संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगांव यांच्या दर्शनाचा योग आला. शेगावची माऊली म्हणजे साऱ्या विदर्भाची पंढरी, नित्य नियमाने येणाऱ्या भाविकांची येथे बाराही मास दर्शनासाठी आस असते. मुंबई, पुणे, नाशिक शहरातील भक्त मंडळी तर जोडून सुट्ट्यांचा लाभ घेत तर विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मंडळी शेती, व्यवसायातून सवड काढून महाराजांच्या दर्शनाला येत असतात. मडगाव नागपूर साप्ताहिक विशेष गाडी शेगाव येथे थांबा मिळाल्यामुळे दर्शनास येणे सोयीचे झाले. आमच्याच कंपार्टमेंट मध्ये मडगावचे कुटुंब होते, साहजिकच गप्पांमध्ये तेही महाराजांच्या दर्शनाला येत होते. देसाई कुटुंब, त्यांच्या आईने वयाच्या १४ व्या वर्षी शेगावी येऊन दर्शन घेतले होते. आज ४५ वर्षांनी येणे झाले. संदर्भ असा की, महाराजांचे भक्त दूरवर आहेत, त्यांच्यावर महाराजांची कृपा आहे, म्हणूनच भक्तांना भेटीची ओढ कायम असते. द्वादशीच्या माऊलींच्या दर्शनानंतर, दोन ८२- ८५ वर्षीय आजी महाराजांच्या दर्शनानंतर प्रदक्षिणा घालताना भेटल्यात. कमरेत वाक आला तरी, महाराजांच्या निस्सीम भक्तीची ओढ त्यांच्या डोळ्यात, चालण्यात होती. पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्याची आतुरता लागली. एक आजी बुलढाणातील खेडे गावच्या तर दुसऱ्या आजी मल्हारा, परतवाडाच्या, नगझिरे कुटुंबातील त्यांचा नातू दर्शनासाठी घेऊन आला होता. या साऱ्यांची महाराजांप्रती असलेली श्रद्धा, भक्ती पाहून मन अचंबित होते, ओलावून जाते. यांच्या भक्तीतून परमार्थाचा रस वहात असतो. कर्ता करविता तोच, आपण मात्र निमित्त, फुकाचा अभिमान बाळगत मी, आम्ही, आपण, तुम्ही, तुमचे करत सार्थ अभिमान बाळगत असतो. गण गण गणात बोते.🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा