साहेब, मी विजय वाणी , (३ जाने २०१९) आजपासून आपला पी ए म्हणून काम करणार आहे. साहेबांनी पाहिलं, " बरं " म्हणाले आणि *वरिष्ठ आय ए एस अधिकारी श्री संजय सेठी साहेब (१९९२)* यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.
साहेबांची एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मधील केबिनचे रीन्युवेशन काम सुरू होते, ते पूर्ण होई पर्यंत साहेबांना रहेजा सेंटर येथील ऑफिस मध्ये काम करायचे होते आणि १६ जानेवारी रोजी प्रवेश करण्याचे योजिले. त्याच दिवशी साहेब, पहिल्या प्रहरात पोर्ट राऊंड करून एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मध्ये दुपारी प्रवेश करते झाले. *लोकमत " बेस्ट पर्सनोलीटी आय ए एस अवॉर्ड "* मिळविणाऱ्या साहेबांना पाहण्यासाठी संपूर्ण गर्दी झाली होती. साहेबांसोबत सौ सोनिया सेठी आय ए एस अधिकारी पणं होत्या. अशा प्रकारे कामकाजास सुरुवात झाली.
२६ जानेवारी गणतंत्र दिवस साजरी होणार होता आणि साहेबांनी मराठीत भाषण करायचे म्हणून निर्णय सांगितला. चेअरमन ऑफीसला येऊन १५ दिवसच झाले होते, पणं जे एन पी च्या ३३ वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने तीन पानांचे मराठीत भाषण लिहून दिले. कामाच्या व्यापात साहेबांनी ते पाहिले देखील नाही आणि ध्वजवंदन समयी, साहेबांनी भाषण मागितले, साहेबांनी ते तसेच वाचून दाखविले आणि माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविला. यापुढील साहेबांच्या प्रत्येक कामात महत्वाचा सहभाग मिळू लागला. चुकांच्या वेळी साहेब रागवायचे पणं त्यांच्या रागवण्यात प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळायचे.
प्रत्येक पी ए चे एक स्वप्न असते, चेअरमन अर्थात आय ए एस अधिकाऱ्यांसोबत काम करायला मिळावे, ते स्वप्न पूर्ण झाले होते. साहेबांची दर सोमवारी दुपारी ३ वाजता होणारी एच ओ डी मीटिंग आणि वाणी, हे साहेबांसाठी समीकरणच होते. मीटिंगचे मिनिट्स केवळ औपचारिकता म्हणून पहात होते, एवढा विश्वास नक्कीच मिळविला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये श्री उन्मेश वाघ साहेब, आय आर एस यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांच्याकडे काम करण्यास मी आग्रही होतो, साहेबांनी त्यांच्या कामातही लक्ष द्यावे लागेल, या अटीवरच पणं नाखुशीनेच परवानगी दिली. पुढे कोरोना काळ , पोर्ट खाजगीकरण, वाढवणं पोर्ट, एस ई झेड, पार्किंग प्लाझा, या प्रकल्पांच्या प्रचंड कामात साहेबांनी नियोजनपूर्वक काम करून पूर्णत्वास नेले. केवळ प्रकृतीची जपणूक (व्हि आर एस चा मोह ?) कारणामुळे सेवानिवृत्ती स्वीकारली आणि अत्यंत शिस्तबद्ध अधिकाऱ्यांच्या तालमीत मिळालेल्या गुणांना दुसऱ्या क्षेत्रात काम करण्यासाठी सिद्ध झालो. *साहेबांना अतिरिक्त सचिव पदाच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा*.
विजयकुमार वाणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा