(१)
सुरक्षे सोबत थोडी माणुसकी ही जपावी !!
म. टा . दिनांक १२ जून २०२३ च्या विचार सदरात संचालक रेल्वे मंत्रालय यांचा "रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह नको" लेख वाचला. सदर लेखात, उपाय योजनांची माहिती दिली आहे, पणं तरीही अपघाताची शृंखला चालूच आहे. गेल्या दीडशे वर्षांच्या कालखंडात, लाखभर किमी लांबीचे मार्ग, रोज अडीच कोटींचे प्रवासी, लाख टनाची वाहतूक, हजारो स्टेशने, लाखभर गाड्या , हा सारा पसारा ,बारा तेरा लक्ष कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली धावत असतो. बलाढ्य व्यवस्थापन म्हणून नावलौकिक मिळविलेल्या रेल्वेत, आजपर्यंतच्या ३९ केंद्रिय रेल्वे मंत्र्यांच्या कारकीर्दीत, शंभराहून अधिक प्रवासी मृत्यमुखी होण्याचे प्रमाणात पंधरा सोळा अपघात झालेत. पण प्रत्यक्ष अपघात स्थळी, स्थानिक ग्रामीण भागातील खेडूत, स्वयंसेवी संघटना , स्थानिक प्रशासन, संबधित राज्य सरकार यांची जीवापाड मेहनतीने प्रवाशांचे जीव वाचविण्यापासून , प्रथमोपचार ते खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यापर्यंत धडपड चालू असते. काही प्रहराने, रेल्वे फोर्स, सेंट्रल फोर्स यांचे आगमन होते, आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांची हकालपट्टी करून कर्तव्याची उपेक्षा केली जाते. शिवाय हेच रेल्वे प्रशासन, याच गावांना पाणी पाइपलाइन, इलेक्ट्रिक पोल, बायपास, अंडरपास, फ्लाय ओव्हर, एफओबी किंवा एक्सप्रेस , पॅसेंजर थांबा आदी मागण्यांसाठी, वर्षानुवर्षे लटकवत असते, अगदी राज्य शासन, आमदार खासदारांच्या मागण्या आणि प्रवासात येणाऱ्या वाईट अनुभवांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वेकडे प्रचंड मुजोरपणा आहे. प्रत्येक अपघाताची वेळ, स्थान, कारणे, वेगवेगळी, अपघात प्रसंगी जखमींवर उपचार, मृत पावलेल्यांना नुकसान भरपाई, चौकशीचे आदेश, भविष्यात चुका टाळण्याचे आश्वासन असा सारा मेलोड्रामा चालतो. आताही पुन्हा सारे तेच चौकश्या, समित्या, फार्स निर्माण होईल, थोडे दिवसात दुःखही विरून जाईल, पणं समान्यांप्रती यांची मुजोरी वर्षानुवर्षे अशीच राहील.
विजयकुमार वाणी, पनवेल
(२)
बलाढ्य म्हणून . . मुजोरी कायम !!
लोकसत्ता दिनांक ५ जून २०२३ चे संपादकीय "पुढचे पाठ..?" वाचले. एकूण, १७० वर्षांच्या कालखंडात, देशात लाखभर किमी लांबीचे मार्ग, रोजचे अडीच कोटींचे प्रवासी, कित्येक लाख टनाची वाहतूक, हजारो स्टेशने, लाखभर गाड्या , हा सारा पसारा ,बारा तेरा लक्ष कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली धावत असतो. बलाढ्य व्यवस्थापन म्हणून नावलौकिक मिळविलेल्या रेल्वेत, आजपर्यंतच्या ३९ केंद्रिय रेल्वे मंत्र्यांच्या कारकीर्दीत, शंभराहून अधिक प्रवासी मृत्यमुखी होण्याचे प्रमाणात पंधरा सोळा अपघात झालेत. प्रत्येक अपघाताची वेळ, स्थान, कारणे, वेगवेगळी. अपघात प्रसंगी जखमींवर उपचार, मृत पावलेल्यांना नुकसान भरपाई, चौकशीचे आदेश, भविष्यात चुका टाळण्याचे आश्वासन असा सारा मेलोड्रामा चालतो. पण त्याआधी, अपघात स्थळी, स्थानिक ग्रामीण भागातील खेडूत, स्वयंसेवी संघटना , स्थानिक प्रशासन, संबधित राज्य सरकार यांची जीवापाड मेहनतीने प्रवाशांचे जीव वाचविण्यापासून , प्रथमोपचार ते खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यापर्यंत धडपड चालू असते. कालांतराने रेल्वे फोर्स, सेंट्रल फोर्स , माध्यमांचे आगमन होते आणि अगदी मोबाईलच्या प्रकाशात हातास मिळेल त्या आयुधाने प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाते. सामान्यांच्या माणुसकीची उपेक्षा केली जाते. पण हेच रेल्वे प्रशासन, याच गावांना पाणी प्रवाहासाठी, इलेक्ट्रिक खांबासाठी, इकडून तिकडे जाण्याचा बायपास, अंडरपास फ्लाय ओव्हर, एफओबी किंवा साधी पाण्याची, इलेक्ट्रिक वायरीच्या पासिंग साठी, एक्सप्रेस , पॅसेंजर थांब्यासाठी वर्षानुवर्षे लटकवत असते, अगदी राज्य शासन, आमदार खासदारांच्या मागणीकडेही दुर्लक्ष करणारी रेल्वेकडे प्रचंड मुजोरपणा आहे. अपघाताच्या चौकशी नंतर त्याच्या उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी किती कशा प्रमाणावर होते याचे ऑडिट होत असेल नसेल, पणं पुनरावृत्ती होऊन अपघातांच्या मालिकेत सामान्य प्रवाशांचा नाहक बळी जातो. आताही पुन्हा सारे तेच चौकश्या, समित्या, फार्स निर्माण होईल थोडे दिवसात दुःखही विरून जाईल, पणं यांची मुजोरी वर्षानुवर्षे अशीच राहील.
विजयकुमार वाणी, पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा