आरास कुणाचीही असो, कुरघोडीचे मखर चीनचेच असणार !!
दिनांक २२ जून २०२३ लोकसत्ता संपादकीय वाचले. मा पंतप्रधानांच्या भेटीवर अमेरिका, भारत व्हाया चीनचे संबंध यावर भाष्य केले आहे. दुसया महायुद्धात जपान, अमेरिकेसोबत चीनचाही शत्रू होता. मात्र तैवान, कोरिया प्रकरणानंतर अमेरिकेचे चीनशी संबध बिघडले असताना देखील, अमेरिकेची पिंग पोंग डिप्लोमसी, किसींजर आणि अध्यक्ष निक्सन यांच्या चीन भेटीत बरेच रहस्य दडलेली आहेत . चीनने साम्यवादी व्यवस्थेत १९७९ साली आर्थिक उदारीकरण सुरू केले. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंधात, चीनला जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले. १९८०च्या दशकात चीन जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, एशियन डेव्हलपमेंट बँक अशा आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सहभागी झाला. २००१ साली चीनचा जागतिक व्यापार संघटनेत प्रवेश झाला. दोन्ही देशांतील व्यापार उच्चांकी पातळीवर गेला. २००८ सालापर्यंत चीन हा अमेरिकेतली कर्जे विकत घेणारा सर्वांत मोठा देश बनला होता. याच वर्षी अमेरिकेतली लेहमन ब्रदर्स ही बँक बुडाली आणि जागतिक मंदी आली आणि अमेरिकेचा चीन स्पर्धक झाला. अमेरिका-चीन व्यापारात अमेरिकेच्या बाजूने मोठी तूट होती. फायदा चीनला अधिक होत होता. त्याच काळात भारताने रशिया सोबत २० वर्षांचं मैत्री करार केला, सोबत युरोपीय, आखाती देश, इराण, यांच्यासोबत आयात निर्यातीचे धोरण अवलंबून, अमेरिका, चीन यांच्यानंतर पर्याय उभा केला. भविष्यात अमेरिकेला बाजूला करून जागतिक महासत्ता बनण्याचे चीनचे मनसुबे जगजाहीर आहेत. व्यापार-युद्धापलीकडे जाऊन उघड वैर पत्करण्यास सुरुवात केली. म्हणून अमेरिकेला पुन्हा जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, फिलि
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा