सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणांचा विचार करणे आवश्यक ।
गेल्या पंधरा दिवसांचा लोकसत्ता वाचनाचा सहजच आढावा घेतला. लोकसत्तातील संपादकीय, स्तंभलेख, वृत्त बऱ्याचदा सत्ताधा-यांच्या घडलेल्या चुका दर्शविणे सोबत दिशा देणारे सुद्धा असते . बरेचसे स्तंभलेख, वृत्त विरोधकांना बळ मिळविण्यासाठी, जागृत करण्यासाठी असतात हे जाणवते . उदाहरण द्यायचे असल्यास न्यायालयांचे एन्काऊंटर , सुरुवात आणि सातत्य , आनंदामागील अर्थ, फेक की नेक ?, पवारांची अदानी अदा, विश्रांतीमागील वास्तव , नामांतरानंतर , दूरचे दिवे हे सारे संपादकीय, सत्ताधारकांचे कान टोचणारे, चुकीचे निर्णय, धोरण आणि एकाधिकारशाहीचे द्योतक असल्याचे दर्शविते. त्या सोबतच तज्ञ लेखकांचे स्तंभलेख जसे आता विरोधी पक्ष काय करणार ?, सरकारच न्यायाधीश , लोकशाही विरोध लोकांना कसा खपेल ? भाजपविरोधी मोर्चे बांधणीला वेग , विकासदर सहा टक्क्यांखाली , स्थानिक यशाची काँग्रेसला गरज , विरोधी बिगुल निर्धाराने वाजवावा , २०२४ नाही, तर नंतरही नाही. , कर्नाटक जिंकेल तो राजकारण भेदेल, हे सारे विरोधकांचे मनोधैर्य वाढवणारे वाटतात . तसेच ध्रुवीकरणाच्या भूमीतून , डिजिटल इंडिया मागील दूरदृष्टी हे अभ्यासू लेख या पसाऱ्यात वाचावयास मिळतात . परंतु या आढाव्यात एकंदरीत देशाचे , सत्ताधा-यांचे असे नकारात्मक चित्र निर्माण होते. म्हणजे या सरकारने गेल्या आठ नऊ वर्षात जे केले आहे ते सारे चुकीचेच आहे का? असे साहजिकच वाटू लागते. एवढी नकारात्मकता यातून दिसून येते . यासाठी या सरकारचे गेल्या आठ नऊ वर्षातील घेतलेले मोठे सर्व निर्णय आणि त्याचे परिणाम याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे , जेणेकरून सामान्यांना , विरोधकांना सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणांचा विचार करता येऊन पुढची संधी द्यावी की न द्यावी याचा विचार करता येईल.
विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा