सामाजिक जागरूकता किती महत्वाची !!
म टा दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ अंकातील " कायदा गतीचा पाळा " संपादकीय वाचले. लेखातून बालविवाह विरोधी स्थिस्ती स्पष्ट करण्यात आली आहे. आजही हे विदारक चित्र असण्याचे अनेक कारण आहेत. भारतातील ग्रामीण, अती दुर्गम, पहाडी, दऱ्या खोऱ्यातील भागात आजही सुधारणांना, नवं विचारांना स्थान नाही. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात बाल विवाह होण्याचे प्रमाण घटत नसल्यामुळे सरकारने २००६ मध्ये बाल विवाह प्रतिबंध कायदा
संमत केला, त्यासही १८ वर्षे होत आली. तरीही जुन्या विचारांचा पगडा आजही जोर धरून आहे. शासन व्यवस्था अपुरी की, लोकांची उदासीनता हेच कळेनासे झाले आहे. गेल्या २० वर्षात मोबाईल क्षेत्रातील क्रांतीने आणि त्यातील सोशल मीडियाच्या रूपाने सारे जग एकवटले गेले, शिक्षित झाले, नव विचाराने प्रेरित झाले. तरीही सरकार बाल विवाह रोखण्यास असमर्थ आहे, यावरून सामाजिक जागरूकता किती महत्वाची आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या हि लक्षात आले.
विजय आप्पा वाणी, पनवेल
विजय आप्पा वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा