मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

लेख (१९७) २३ एप्रिल २०२५

 


सोन्याच्या दरवाढीचा देशाच्या अर्थ क्षेत्रावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम .. 


म टा दिनांक २२ एप्रिल २०२५ अंकातील  " गुंतवणूक संधीचे सोने " संपादकीय वाचले .  भारतीयांचा सोन्याकडे ओढा केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिक , सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही खूप खोलवर रुजलेला आहे.  सोन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानलं जात कारण त्याची किंमत महागाईबरोबर वाढत जाते .  सहज विकता येणार, तारण ठेवता येणार  आणि कुठेही खरेदी करता येणारं एवढी सुलभता गुंतवणुकीच्या कोणत्याच व्यवहारात नाही . जागतिकीकरणाच्या ११९० च्या आधी सोनं हीच मुख्य गुंतवणूक मानली जायची , ग्रामीण भागात सोनं म्हणजे संपत्तीची खात्री.  आर्थिक सुधारणानंतर शहरी भागात शेअर बाजार , म्युच्युअल फंड यांचा पसारा वाढला.  शहरांच्या तुलनेने आजही साठ टक्के सोन्याची खरेदी ग्रामीण भागात केली जाते .  स्वातंत्र्यांनंतर १९५० साली  १०० रुपयांचा असणारा भाव , २०२५ मध्ये लाख रुपयांवर  गेला, यावरून सोन्याची भाववाढ वाऱ्याच्या वेगात होत आहे.  परंतु सोन्याच्या भाव वाढीमुळे देशाच्या आर्थिक सुधारणांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत . बहुतांश सोने आयात करावे लागल्यामुळे आयात खर्च वाढल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढते .  निष्क्रिय गुंतवणुकीमुळे उद्योग रोजगार आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक कमी होते परिणामी बँकांकडे कमी निधी राहून आर्थिक गती मंदावते .  सरकारला याबाबत तातडीचे उपाययोजना करणे गरजेचे आहे .   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: