मतदानाची एकूण टक्केवारी पाहता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होईल एवढे एकगठ्ठा मतदान झालेले दिसत नाही.
दिनांक २७ मे २०२४ लोकसत्ता अंकातील "लालकिल्ला - ब्रँड मोदींचे काय होणार ?" सदर वाचले . पंतप्रधान पदाची लोकप्रियता , आर्थिक वाढ , पायाभूत सुविधा आणि जागतिक स्थरावर भारताची सुधारलेली स्थिती , या बळावर सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाची ४०० जागांची रणनीती आखण्यात आली . परंतु काँग्रेसच्या संविधान संपविण्यासाठीच भाजपाला बहुमत हवे या प्रचारापुढे भाजपच्या रणनीतीला जबर धक्का बसला . विरोधक केवळ त्यांचे पक्ष शाबूत रहावेत , याच अंतप्रेरणेने एकत्रित आले आहेत हे भाजपाला पटवून देता आले कारण काँग्रेसलाही अंतर्गत दुही , अन्य पक्षांची धरसोड वृत्ती या धोरणाने एकूणच निवडणूक प्रचारावर अंकुश ठेवता आला नाही . भाजपासाठी विजय हे एकमेव मूल्य आहे आणि सत्ता मिळवावयचीच याची जिगर आहे , विरोधकांना पूर्णपणे ठाऊक आहे, हि संधी गमावली तर दुसरी संधी मिळणार नाही म्हणून प्रयत्न करीत राहणे. त्यात भाजपचा राममंदिराच्या निर्माणाचा मुद्दा निष्प्रभ होत राहिल्यामुळे, भाजपने देशाच्या ६५ टक्के असलेल्या दलित, मागास आणि इतर उपेक्षित वर्गांमध्ये काही प्रमाणात प्रवेश करीत, जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा हाताशी धरून मतदानाचे सहा टप्पे ओलांडले आहेत . मतदानाची एकूण टक्केवारी पाहता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होईल एवढे एकगठ्ठा मतदान झालेले दिसत नाही , याचाच अर्थ २०१९ चीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढतच चालली आहे . उलटपक्षी भाजपाची मतदानाची टक्केवारी वाढून वीस पंचवीस जागांचा फायदा होऊ शकेल , त्यामुळे पुढील आणखी पाच वर्षे मोदीजींचाच ब्रँड तसाच चकाकत राहून आणखी पुढील पाच वर्षांची तरतूद करून ठेवतील .
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा