ऐशींची ऐसी तैशी !!
दिनांक १५ मार्च २०२४ लोकसत्ता अंकातील " म्हातारे तितुके " संपादकीयात, चाळीसाव्या शतकातील अमेरिकेत जन्मलेल्या दोन चीर तरुणांच्या अध्यक्षपदाच्या लढती चे चित्र रंगविले आहे . वृद्ध होणे हे एका आकारात बसणारी गोष्ट नाही. त्यास अनेक , कंगोरे आहेत , वाटा आहेत . वेगवेगळ्या लोकांमध्ये त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात वापरता येणारी बुद्धिमत्ता , चतुरता आहे, तसा कमकुवतपणा असल्यास तसे व्यक्तिमत्व घडत असते . ठराविक वयात परिस्थितीनुसार , प्रकृती स्वास्थ्यानुसार, अमर्याद बुद्धीची तल्लखतेची ताकद, एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याची कला अवगत असू शकते . अमेरिकेत रोनाल्ड रेगन , ट्रम्प , बायडेन अशी सत्तरी ओलांडणारी अध्यक्षांची परंपरा आहे . तशी क्लिंटन , बुश , यांच्याच वयाचे पण त्यांना फार आधीच संधी मिळाली . त्यात आता ऐशीच्या पुढील अध्यक्ष असे बिरुद मिरवित ट्रम्प, बायडेन चर्चेत आहेत . अमेरिकेच्या आताच्या सर्वेक्षणात १०० पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांची संख्या २० वर्षांच्या तरुणांच्या दुप्पट आहे . वयाच्या साठीनंतर निरोगी राहण्याच्या सवयी पुढील अनेक वर्षे सक्रिय राहतात . चाळिशीनंतर उच्च पदाची , सत्तेची महत्वाकांक्षा वाढू लागल्यास, इच्छे नुसार, कुवतीनुसार , साठीनंतर अनेक कर्तबगारांची करियर घडलेली उदाहरणे अमेरिकेत तशी इतर देशातही आहेत. बायडेन यांच्या वयाचा विचार न करता, त्यांनी माजी अध्यक्ष ट्रम्प , ओबामा यांनी न केलेल्या अनेक द्विपक्षीय करार, बायडेन यांनी मार्गक्रमित केले असल्यामुळे. संसदीय प्रणालीतील त्यांचे हे विशेष निवडणुकीसाठी उपयुक्त आहे . व्यक्ती बद्दल किंवा त्याच्या वया बद्दल काय वाटते या पेक्षा पक्षाची ध्येय धोरणे राष्ट्रास विकसित करीत आहे , हे पाहणेही अमेरिकेच्या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यातील ट्रम्प यांची उमेदवारीही तेवढीच महत्वाची आहे , चांगले किंवा वाईट याचा सारासार विचार करून , अध्यक्ष पदी , पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार , साध्य करत , शेवटच्या टप्प्या पर्यंत पोहोचलेले ट्रम्प यांचे खर्च कौतुक करावेसे वाटते , त्यांच्यावर ९१ गुन्ह्यांचा आरोप आहे , तरीही आज अमेरिकन, त्यांना सत्ताधारींपेक्षा अधिक सक्षम आणि प्रभावी म्हणून पाहतात . ऐशींची ऐसी तैशी करत, जगातील सर्वोच्च पदाचा सन्मान ऎशींच्या तरुणालाच मिळेल हे मात्र आता नक्की ठरले आहे,
विजयकुमार वाणी , पनवेल
